Saturday, August 1, 2009

मैत्री


मैत्री

मैत्री म्हणजे निराशेत आशा
जे दाखवतात खरी योग्य दिशा
मैत्री म्हणजे हिरवे रान
जिथे प्रेमाचा गारवा छान

कधी भांडणाची साथ
कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात
अशी असते निःस्वार्थ मैत्रीची जात

मैत्री करण्यासाठी नसावं लागत
श्रीमंत आणि सुंदर
त्यासाठी असावा लागतो आपल्या
मैत्रीचा आदर

मित्र म्हणजे शुभ्र वस्त्र
दुःखात होते आपुलकीचे पत्र
प्रसंगी होते शत्रुवर अस्त्र
परीक्षा देतात तेव्हा मैत्री आणि मित्र

मैत्री म्हणजे दोन जिवांचा विसावा
गुजगोष्टी आणि निर्मळ ऱ्याचा कालवा

मैत्रीत काही द्यायच नसतं काही घ्यायच नसतं
ते ए़क फक्त विश्वासाच अतुट नात असतं

मैत्री म्हणजे गोंडस बाळ
विश्वास आणि प्रेमाची सुंदरशी माळ

मैत्री आणि मित्र आहे हे दैवी देणं
याच्यासारख नाही कुठलं दुसरं लेणं